Author: newsexpress18pune@gmail.com

*गुटखा प्रकरणांच्या वृत्तांकनाचा राग? दोन अज्ञातांकडून पत्रकारावर हल्ला; पत्रकार संरक्षण कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा* जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके जालना शहरातील पत्रकारितेच्या क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक तथा पत्रकार संतोष विष्णु भुतेकर यांना घरासमोर अडवून दोन अज्ञात इसमांनी बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे लावण्यात आली आहेत. पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, २ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास संतोष भुतेकर हे आपल्या निवासस्थानाजवळील कार्यालयातील काम आटोपून पाळीव कुत्र्याला…

Read More

पिंपरी, प्रतिनिधी:– .दि. 29 मे 2026 : पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोड लगत असणारी भीमशक्ती नगर परिसरातील विद्युत वायर्स खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी विश्वनाथ लहाने कार्यकारी अभियंता भोसरी विभाग महावितरण यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, स्पाईन रोड लगतं भीमशक्तीनगर परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात विद्युत तारा अत्यंत खाली आल्या असून, नागरिकांच्या घरांजवळ तसेच रस्त्यालगत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात सुमारे 10 हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची वर्दळ असते. विशेषतः लहान मुले,…

Read More

प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे **पिंपरी:** सतत होणारी पेपरफुटी, रखडलेली नोकरभरती आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ ‘झुरळं जनता पार्टी’ आणि तिचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवार, ६ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हे आंदोलन होणार आहे. या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात आंदोलनाची पूर्वसूचना देणारे पत्र सादर करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्याचे आवाहन केले आहे. बेरोजगार तरुण स्वप्निल जेवळे आणि इतर कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे आयोजन केले आहे. सध्याच्या व्यवस्थेमुळे स्पर्धा परीक्षा देणारी पिढी आणि बेरोजगार तरुण अडचणीत सापडले असून, त्यांच्या व्यथा…

Read More

# 🚨 **मोठी बातमी: खराबवाडीत गॅस रिफिलिंगच्या मोठ्या अड्ड्यावर दरोडा; ८१ गॅस टाक्यांसह पोलिसांच्या छाप्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!** **पिंपरी-चिंचवड:** शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने आणखी एक धडक कारवाई केली आहे. “02-06-2026 press note.pdf” या फाईलमध्ये नमूद केलेल्या कारवाईव्यतिरिक्त, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका अत्यंत धोकादायक अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा पर्दाफाश केला आहे. ### 🚩 **हनुमान मंदिराजवळ लोकांचा जीव धोक्यात घालून सुरू होता काळाबाजार** * **गुप्त माहितीच्या आधारे छापा:** दिनांक २ जून २०२६ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना चाकण-म्हाळुंगे रस्त्यावरील…

Read More

### 🚨 **मोठी बातमी: पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’! २४ तासांत २७ गुन्हे दाखल** **पिंपरी-चिंचवड:** शहरातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस गुन्हे शाखेने गेल्या २४ तासांत धडक कारवाईचे सत्र राबवले आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, एकाच दिवसात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गॅस सिलिंडरचा काळाबाजार, प्राणघातक हल्ले आणि अवैध दारू धंद्यांवर छापे टाकत पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. ### 🏍️ **पिंपळे सौदागरमध्ये भीषण अपघात; तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू** * **वेग ठरला काळ:** नाशिक फाट्याकडून कोकणे चौकाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पल्सर २२० दुचाकीने पी.के. चौकातील बी.आर.टी. बस स्टॉपच्या भिंतीला भीषण धडक दिली. * **चालकाचा मृत्यू:** या अपघातात दुचाकीस्वार **संकेत प्रभाकरराव गुंजकर** (रा. वनाज) याचा गंभीर दुखापत…

Read More

जालना (प्रतिनिधी) :- जालना शहरात ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवून दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला जालना पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATU) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी एक तलवार जप्त केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ​नेमकी घटना काय? जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे आणि त्यांचे पथक माहिती घेत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. ​शिवाजी पुतळा परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये एका तरुणाने ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवली असून, तो…

Read More

घरकुल, विहीर, जलजीवन ते मनरेगा योजनांत लूट; संदीप पवार यांच्या निलंबनाची जोरदार मागणी* *गरीबांच्या योजनांवर डल्ला टाकणाऱ्यांवर FIR दाखल करा; जालन्यात संतापाची लाट* प्रतिनिधी – जालना पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा गटविकास अधिकारी श्री. संदीप पवार यांच्या विरोधात विविध शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, आर्थिक अपहार आणि बोगस निधी वाटप केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद जालना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत घरकुल योजना, सिंचन विहिरी, गाय गोठा योजना, मनरेगा, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गरीब लाभार्थ्यांकडून उघडपणे पैसे उकळून शासनाच्या…

Read More

राहुरी (प्रतिनिधी) : राहुरीतील बंदीखान्यात कैद्यांना जेवण देणाराच कैद्यांना चक्क दारुचा पुरवठा करत असल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून बिनदिक्कतपणे जेलमध्ये हा सर्व प्रकार चालत होता. जेलप्रशासन मात्र प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे चित्र होते. अखेर कर्तव्यावर असलेल्या हवालदार सानप यांना संशय आल्याने, अखेर हे रॅकेट उघड होत, पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात सविस्तर माहितीनुसार, दिनांक ३० मे २०२६ रोजी राहुरी येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांना भत्ता पुरवणारे अधिकृत पुरवठादारांचा प्रतिनिधी किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ (वय ४०) राहणार मुलनमाथा राहुरी याने कैद्यांना भत्ता आणला असता, गार्ड ड्युटीवर हजर असणारे पोलीस हवालदार रामनाथ सानप यांनी सदर भत्त्याची पाहणी केली. पाहणीत…

Read More

राहुरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अत्यंत शिताफिने तपासाची सुत्रे फिरवत चार दिवसात सदर पिडीतेचा शोध घेण्यात राहुरीच्या पोलीस पथकाला यश आले आहे. पिडीतेला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत आतापर्यंत १११ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात सविस्तर माहितीनुसार, तालुक्यातील फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या अल्पवयीन (१६) मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत तक्रार दिल्याने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५९९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे दिनांक २७ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील…

Read More

जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. तब्बल चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. नेमकी घटना काय? चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील खादगाव येथील एका ३९ वर्षीय महिलेने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीला माळशेंद्रा (ता. जि. जालना) येथील आरोपी दीपक राजू जाधव (वय २५) याने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अनेक दिवस तपास करूनही आरोपी आणि पीडिता मिळून येत…

Read More