राहुरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अत्यंत शिताफिने तपासाची सुत्रे फिरवत चार दिवसात सदर पिडीतेचा शोध घेण्यात राहुरीच्या पोलीस पथकाला यश आले आहे. पिडीतेला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत आतापर्यंत १११ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहितीनुसार, तालुक्यातील फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या अल्पवयीन (१६) मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत तक्रार दिल्याने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५९९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे दिनांक २७ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने मुलीचा तांत्रिक व भौतिक पुराव्याच्या अनुषंगाने शोध घेतला असता, सदर मुलगी मिळून आल्याने तिला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे, पोलीस नाईक कुदळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पठाण, महोम, पवार यांनी केली असून तापसास तांत्रिक मदत मोबाइल सेल श्रीरामपूर येथील पो. हवालदार दरेकर, धनाड यांनी केली आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज एक्सप्रेस १८,
**Facebook | Twitter | Pinterest | LinkedIn**
