एलपीजी टंचाईत नागरिकांसाठी मदतीचा हात; कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनचा आदर्श उपक्रम**
प्रतिनिधी पिंपरी

पिंपरी चिंचवड :- अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी (गॅस) टंचाईची समस्या तीव्र होत असून, घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी विविध भागांमध्ये नागरिकांना लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.
याच परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील कृष्णा नगर, फुलेनगर परिसरात कडाक्याच्या उन्हात तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनने पुढाकार घेतला. फाऊंडेशनच्या वतीने रांगेतील सर्व नागरिकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सामाजिक बांधिलकी जपत फाऊंडेशनने एक आदर्श निर्माण केला आहे. कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशन हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या वेळी मारुती जाधव, दत्ता धर्मे, अभी जाधव, कृष्णा जाधव, यश अवसरमल, गणेश देवगिरे, धनंजय जाधव तसेच मित्रपरिवार उपस्थित होता.



