Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»गुन्हेगारी»झोपडपट्टी सेवाकराच्या माध्यमातून ९७ लाख ३५ हजार रुपयांची वसुली*
गुन्हेगारी

झोपडपट्टी सेवाकराच्या माध्यमातून ९७ लाख ३५ हजार रुपयांची वसुली*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comMarch 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २७ मार्च २०२६ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १७ एप्रिल २०२५ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत ९७ लाख ३५ हजार ६६० रुपयांचा झोपडपट्टी सेवाकर वसूल झाला आहे. चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ रोजी संपणार असून, तोपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे कार्यालय साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. सेवाकर भरणा सुलभ व्हावा आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली करदात्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने झोपडपट्टी सेवाकर भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षातील झोपडपट्टी सेवाकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात सेवाकर भरता येणार आहे. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सेवाकर भरण्यासाठी विभागाचे कार्यालय सुरू राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली आहे.

*असा भरा ऑनलाइन सेवाकर*

• ज्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बिल मिळाले आहे, ते नागरिक सदर बिलाचा भरणा घरबसल्या ऑनलाइन करू शकतात.

• तुम्हाला मिळालेल्या बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस दिलेला क्यूआर कोड (QR Code) मोबाईलद्वारे स्कॅन करा.

• क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे नाव व बिलासंबंधी इतर संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल. कृपया माहिती तपासून घ्या.

• माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, त्याखालील “Pay Bill Here” या बटणावर क्लिक करा.
• UPI / Credit Card / Debit Card / Net Banking / Digital Wallet यांपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून बिलाचा भरणा पूर्ण करा.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी सेवाकर वसुलीत झालेली ९५ लाखांहून अधिकची वसुली ही सकारात्मक बाब आहे. नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देत कर भरणा सुलभ व्हावा, यासाठी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर वेळेत भरावा आणि शहराच्या विकासात सहकार्य करावे

*- रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका*

झोपडपट्टी सेवाकर वसुलीमध्ये पारदर्शकता आणि सुलभता यावर विशेष भर देण्यात आला आहे. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून उपलब्ध सुविधांचा लाभ घेत वेळेत सेवाकर भरावा.

*- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका*
…..

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleक्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत महापौरांच्या हस्ते कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर…*
Next Article एलपीजी टंचाईत नागरिकांसाठी मदतीचा हात; कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनचा आदर्श उपक्रम**
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

By newsexpress18pune@gmail.comJune 1, 20260

**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले** **राहुरी /…

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.