Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत महापौरांच्या हस्ते कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर…*

*विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा प्रस्ताव; सर्व सदस्यांची एकमताने मंजुरी...*

पिंपरी, दि. २७ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कला, क्रीडा व साहित्य समितीची आढावा बैठक कला, क्रीडा व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील धोरणांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत शहरातील कलाकार, खेळाडू व साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, त्यांना योग्य सन्मान देणे तसेच त्यांच्या कर्तृत्वाची दखल शहर, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कशी घेतली जाईल याबाबत विस्तृत विचारमंथन करण्यात आले.

या बैठकीस कला, क्रीडा व साहित्य समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर ,शाम जगताप, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे तसेच उप आयुक्त पंकज पाटील,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर पिंपरी चिंचवडचे नाव उंचावणाऱ्या कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षनेते तथा कला क्रीडा व साहित्य समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी हा ठराव मांडला असून सर्व सदस्यांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.

यावेळी पुणे महापौर चषक या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या संघाचा कला, क्रीडा व साहित्य समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. सभापती कैलास कुटे यांच्या हस्ते संघाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले . या संघात मनीषा राठोड, रेखा राठोड, कोमल राठोड, शिफा वस्ताद, सविता गवई, भूमिका गोरे, विधा गायकवाड, निकिता माळी, पूजा तेलंग, श्रावणी सावंत, रूपाली डोंगरे, कीर्ती कडगंची, प्रीती केरळकर आणि नंदिनी साधू यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button