Site Logo
पिंपरी चिंचवडगुन्हेगारीमहाराष्ट्र

रिक्षा चोरुन इतर ठिकाणी जबरी चोरी व चोरी करणाऱ्या आरोपीस ने १२ तासाच्या आत अटक

आरोपी कडुन १,०७,०५०/- रु किंमतीचा मुद्येमाल केला जप्त.

पिंपरी :- मा. वरिष्ठांच्या आदेशाने व सुचनेनुसार भोसरी एमआयडीसी पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १६४/२०२६ भा.न्या.स कलम ३०९ (६) अन्वये दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे तसेच पो. उपनि सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सचिन गोनटे, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, तुषार वराडे, निखील फापाळे व राजकुमार इघारे असे समांतर तपास करीत असतांना तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील संशयीत आरोपी हा स्टार झुडीओ चे समोर रोडच्या बाजुला, भोसरी येथे अंगावर लाल रंगाचे हुडी असलेले जर्कीग, काळ्या रंगाची साधी पॅन्ट घातलेला उभा आहे. अशी माहीती मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेवून त्यास त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नावे हारीश विनोद कदम वय २० वर्षे रा. लोअर इंदीरा गांधीनगर, दुर्गा माता मंदिराजवळ, बिवेवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यातुन ५०००/- किंमतीचा एक सिल्वर रंगाचा मोबाईल फोन व गुन्हयातील मारहान करुन हीसकावलेले २०५०/-रुपये मिळून आले तसेच त्याने कबुली जबाब दिला की त्याने गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा क्रमांक एमएच१२ एसके ४९६७ तीची किंमत अदाजे रु १,००,०००/- ही सहकारनगर पुणे शहर येथुन चोरी करुन आणलेली असुन ती उर्से टोलनाका जवळ ठेवली आहे. सदरची रिक्षा आरोपी कडुन निवेदन पंचनाम्याने जप्त केली आहे. सदर रिक्षाबाबत अभिलेख पाहता सहकारनगर पोस्टे पुणे शहर हद्यीमधुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन पोस्टे सहकार नगर गुन्हा रजि नं. १०१/२०२६ भा. न्या. स. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपीने सहकारनगर येथुन रिक्षा चोरुन घेवुन येत असतांना विश्रांतवाडी ते आळंदी रोडवर आलंकापुरम चौका जवळ, वडमुखवाडी, दिधी येथे एक मारुती स्वीप्ट कार क्रमांक एमएच १२केऐ६७१३ चे समोर आरोपीने रिक्षा उभी करुन कारमधील चालकाच्या मांडीवरुन खिडकीमधुन हात घालुन सॅमसंग कंपणीचा मोबाईल रु १०,०००/- किंमतीचा चोरी करुन रिक्षासह पळुन गेला त्यावरुन दिघी पोस्टे गुन्हा. रजि नं.१३०/२०२६ भान्यास कलम ३०४ (२) अन्वये दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नमुद आरोपी कडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली सहकार नगर येथुन चोरी करुन आनलेली रक्षा क्रमांक एमएच१२ एसके ४९६७, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण १,०७,०५०/- रु किंमतीचा मुद्येमाल १२ तासाच्या आत जप्त करुन १) भोसरी एमआयडीसी पो.स्टे. गुन्हा रजि. नं १६४/२०२६ भा.न्या.स कलम ३०९ (६) २) सहकार नगर गुन्हा रजि नं.१०१/२०२६ भा.न्या.स. कलम ३०३(२) ३) दिघी पोस्टे गुन्हा. रजि नं.१३०/२०२६ भा.न्या.स कलम ३०४(२) असे एकाच दिवशी केलेल्या जबरी चोरी व चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो.. मा.पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर सो, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड सो., मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री डॉ. शिवाजी पवार सो.. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. डॉ. विशाल हिरे, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रगाणे श्री. संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनि सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोन्हाडे, सचिन गोनटे, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखील फापाळे तसेच तांत्रीक विश्लेषन शाखेकडील सपोफौ माळी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button