पुसद ईदगाह येथे सैय्यद सलमान सरांची एस.आय आर बाबत जनजागृती
ईद निमित्ताने हजारो मुस्लिम बांधवांना एस आय एम बद्दल केले मार्गदर्शन.

सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद | दिनांक : 21 मार्च 2026
पुसद शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर ईदगाहा कमिटीच्या परवानगीने रमजान ईदच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आलेल्या हजारो बांधवांना मुद्देसुद माहिती पुसद शहरातील व्याख्याते व सामाजिक कार्यकर्ते सैय्यद सलमान सर यांनी निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
खुतबा (प्रवचन) संपल्यानंतर सैय्यद सलमान सरांनी उपस्थित हजारो नागरिकांना SIR संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या मॅपिंग प्रक्रियेचे महत्त्व, तसेच BLO (Booth Level Officer) आणि DLO (District Level Officer) यांच्याकडून येणाऱ्या फॉर्म व आवश्यक कागदपत्रांची माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली.
यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, मॅपिंग प्रक्रियेसाठी आपल्या संबंधित BLO अधिकाऱ्यांना भेटून मतदार ओळखपत्र (Election Card) आणि 2002 च्या मतदार यादीतील नोंद यांची पूर्तता करावी. तसेच, नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन DLO कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
“नागरिकांनी स्वतःहून ही प्रक्रिया पूर्ण केल्यास प्रशासनालाही सोयीस्कर ठरेल आणि भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
रमजान ईदच्या पवित्र प्रसंगी जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये SIR प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण झाली त्याबद्दल आलेल्या मुस्लिम बांधवांनी सैय्यद सलमान सरांचे आभार व्यक्त केले.



