तलवार बाळगून फिरणा-या इसमावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
पुसद तालुका प्रतिनिधी

.यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, पाहीजे व फरार आरोपी शोध अवैध शस्त्र स्वतःचे ताब्यात बाळगून दहशत निर्माण करणा-या इसमांबाबत गोपनिय माहीती काढून कायदेशिर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक कुमार चिता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 23/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पोलीस स्टेशन बिटरगांव हददीत ढाणकी 17/50 वाजण्याचे सुमारांस पेट्रोलींग करीत असतांना टेंभेश्वर नगर ढाणकी येथील इसम नामे-अविनाश कानबा प्रेमलवाड यांचे जवळ लोखंडी धारधार तलवार असून तो ढाणकी ते मेट रोड लगत असलेल्या नगर पंचायत सार्वजनिक विहीरी जवळ थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे करण्याची शक्यता आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह ढाणकी ते मेट रोड लगत असलेल्या नगर पंचायत सार्वजनिक विहीरी येथे रवाना होवून संशयीत इसम नामे अविनाश कानबा प्रेमलवाड यास ताब्यात घेवून पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ कमरेला एक लोखंडी टोकदार धारधार तलवार किंमत 2000/-रुचा स्वतःच्या ताब्यात बाळगुन असतांना मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे अविनाश कानवा प्रेमलवाड वय 29 वर्ष, रा.टेंभेश्वर नगर ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन बिटरगांव येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, तसेच मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफी/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांव, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



