महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रूपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार!
सौ . अनुजा कारखेले-देवरे (नाशिक जिल्हा) प्रतिनिधी.

महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रूपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार!
नाशिक :- सध्या महाराष्ट्रांत चर्चेत असणारा विषय नाशिक येथील अशोक खरात या भोंदू बाबाच्या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. खरात या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात देखील एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकरांचे नाव चर्चेत आल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. समाजात वावरताना आणि विशेषता: राजकारण समाजकारणात सक्रिय असताना नेत्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे, आणि आपल्या वागण्याचे जनतेवर काय परिणाम होतील याचे भान ठेवले पाहिजे असा सूचक इशारा भुजबळांनी दिला आहे. चाकणकरांनी या खरात संस्थेशी निगडित होत्या. यावर बोलताना भुजबळ म्हणाले… की अनेकदा पद हाताशी असल्यावर संस्था आपल्याला मदतीसाठी किंवा पदाचा फायदा होईल या हेतूने नाव जोडतात. पण चाकणकर या पुण्याच्या आहेत. कदाचित त्यांना कोणीतरी नेले असावे, अशा प्रकरणामुळे समाजकारण करणाऱ्या लोकांची प्रतिमा डागाळली जाते. चाकणकर यांची महिला आयोगांच्या अध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटविण्यात येणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात भुजबळांनी स्पष्ट केले आहे की, महिला आयोगाचे पद हे शासकीय असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेवुन रूपाली चाकणकरांकडून तात्काळ राजीनामा देखील घेतला आहे. आणि या नाशिक भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडूनही असून केला जात आहे.*



