Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 29, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील – महापौर रवि लांडगे*
पिंपरी चिंचवड

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील – महापौर रवि लांडगे*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comMarch 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २५ मार्च २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्याने रूजू झालेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने त्यांचा सभागृहाला परिचय करून देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून यशस्वी कामकाज करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी त्यांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी गतिमान प्रशासनातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधतील, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या विशेष सभेला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर तसेच नगरसदस्य, नगरसदस्या, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष सभेत सुरुवातीला आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांचा परिचय करून देण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे शालेय शिक्षण जि. प. शाळा, देवळा तसेच सैनिक स्कूल, सातारा येथे पूर्ण केले आहे. ते २००६ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असून त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रशासनात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), जिल्हा परिषद कोल्हापूर व पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया व रायगड येथे जिल्हाधिकारी, तसेच भारताचे संरक्षण मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई येथे अतिरिक्त महानगर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त तसेच कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत, अशी माहिती परिचयामध्ये देण्यात आली.

तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रशासकीय काळात मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी केलेली विशेष कामगिरी याबाबत देखील सविस्तर माहिती देण्यात आली. प्रास्ताविक महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.
….

*आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळालेले पुरस्कार*

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे कार्यरत असताना, सन २०१५ मध्ये राज्यस्तरीय यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार, तसेच देशपातळीवरील रु. २५ लाखांचा पुरस्कार प्राप्त.

कोल्हापूर येथे कार्यरत असताना, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुधार करण्यासाठी “कायापालट अभियान” प्रथमच सुरुवात केली, जी आता राष्ट्रीय पातळीवर कायाकल्प पुरस्कार म्हणून राबविली जात आहे.

रायगड जिल्हाधिकारी असताना रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक.

जिल्हाधिकारी गोंदिया असताना, नरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट श्रेणीचा पुरस्कार.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी-२०२० अंतर्गत गृहनिर्माण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेला कोविड इनोव्हेशन पुरस्कार.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत असताना एम.ई.डी.ए. यांनी आयोजित केलेल्या १६ व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन स्पर्धेमध्ये “महापालिका इमारती व रुग्णालयामध्ये ऊर्जा संवर्धन, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा व जलनिस्सारण” पुरस्कार प्राप्त.

स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण मंत्रालय, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या फ्रिडम-टू-वॉक व सायकल स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांनी उत्कृष्ट आरोग्यासाठी भाग घेतला, त्यात देशात प्रथम क्रमांक मिळवला.

महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागीय आयुक्त, कोकण विभाग कार्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.
………
*आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची आतापर्यंतची विशेष कामगिरी :*

कोल्हापूर येथे कार्यरत असताना, जिल्हा परिषद संचलित देशातील पहिली निवासी क्रीडा प्रशाला सुरू केली. गेल्या ८ वर्षांमध्ये ५५० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहेत.

गोंदिया येथे कार्यरत असताना, दुर्मिळ अशा सारस पक्षाचे संवर्धन करण्यासाठी देशातील नामांकित छायाचित्रकारांना निमंत्रित करून सारस महोत्सव आयोजित केला आणि धानाच्या शेतात सारस पक्षाने टाकलेल्या अंड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना ‘सारस मित्र’ पुरस्कार सुरू केला. यातून सारस पक्षाचे संवर्धन होण्यास खूप मदत झाली.

गोंदिया येथे बेघर असलेले व राज्यभर भटकंतीमुळे स्वतःचा पत्ता नसलेल्या नाथजोगी समाजाला मालकीची घरे देऊन स्वतःची वस्ती निर्माण करून दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुसद ईदगाह येथे सैय्यद सलमान सरांची एस.आय आर बाबत जनजागृती
Next Article 📰 रेल्वे नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; आरोपी अद्याप फरार…
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 29, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

By newsexpress18pune@gmail.comJuly 29, 20260

क्राईम रिपोर्टर :- परमेश्वर कांबळे मो…8668612357 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २८ जुलै २०२६ रोजी…

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.