
पिंपरी-चिंचवड येथील चिंचवड परिसरातील AMRAPALI GAS SUPPLY CO या HP Gas वितरकाविरोधात गंभीर तक्रारी समोर येत आहेत.

ग्राहक श्री. प्रकाश बचुमल नारंग (Consumer No: 681258) यांच्या नावाने दिनांक 10 मार्च 2026 रोजी गॅस सिलिंडर बुक करण्यात आला होता (Booking No: 660596). मात्र, आज दिनांक 24 मार्च 2026 पर्यंत संबंधित ग्राहकास गॅस सिलिंडर मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, बुकिंगची स्थिती “Out For Delivery” दाखवली जात असून OTP देखील जनरेट झाला आहे, तरी प्रत्यक्षात सिलिंडर वितरित करण्यात आलेला नाही.
ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे नाराजी वाढत आहे.
तक्रारदार प्रकाश नारंग यांनी सांगितले की, “एजन्सीशी संपर्क साधल्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, उलट ‘तक्रार करा’ असे सांगण्यात आले.”
या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तक्रार करण्यात आली असून, संबंधित पुरावे (बुकिंग डिटेल्स, स्क्रीनशॉट व कॉल रेकॉर्डिंग) सादर करण्यात आले आहेत.
ग्राहकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना वेळेवर गॅस उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

– प्रकाश बचुमल नारंग
मोबाईल: 8793981432



