गोवंश मांस कटई करणारे यांच्या वर पुसद शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई!*
पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद तालुका प्रतिनिधी ०८/०३/२०२५ रोजी पोलीस स्टेशन पुसद (शहर) चे ठाणेदार पो.नि. सेवानंद वानखडे, स.पो.नि प्रेम कुमार केदार हे त्यांचे पोलीस स्टाफ श्रेणी पोउपनि रमेश ईगळे ब.नं ८७०, पोकों अमित पाटील ब.नं २५४५, पोकॉ आकाश बाभुळकर ब.नं २०३८, पोहवा मनोज कदम ब.नं १४६३ यांचे सह पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असतांना अदांजे ७/१५ वा चे सुमारास त्यांना गोपनिय मुखबीरा कडुन खात्रीलायक माहाती मिळाली की, एक ईसम नामे मोहम्मद आसिफ मोहम्मद तयब कुरेशी वय ४४ वर्ष रा. गढीवार्ड हा त्यांच्या घरासमोरील अंगणात गोवंशाचे मास कटई करीत आहे. अशा मिळालेल्या माहीती वरून दोन पंच व पोस्टाफ सह वरील नमुद ईसमाच्या घराचे समोरील अंगणामध्ये गेले असता एक ईसम सुरीने गोवंशाचे मांस कटई करीत असतांना मिळुन आला पंचासमक्ष त्यांचे नांव विचारले असता त्यांनी आपले नांव मोहम्मद आसिफ मोहम्मद तयब कुरेशी वय ४४ वर्ष रा. गढीवार्ड त्यास गोवंशाचे मांस असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सागितले की, बडे गोंश हे असे सागितले त्यावरून आरोपीस मुददेमालासह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आणले व श्री. सुशिल शंकर चव्हाण पशुवैद्यकिय अधिकारी लघु पशु चिकिस्तालय पुसद मांसाची तपासणी केली आहे. आरोपी नामे मोहम्मद आसिफ मोहम्मद तयब कुरेशी वय ४४ वर्ष रा. गढीवार्ड यांच्याकडुन एक सुरी जुनी वापरती किमत ००.०० रूपये, प्रथमदर्शनी गोवंश मांस वजन अंदाजे ७० किलो ग्रॅम किमत अंदाजे २५०/- रू किलो एकुण किमत १७,५००/- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. व आरोपी विरूध्द अप.क २०८/२०२६, कलम-५, ५ (B) महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम-१९७६ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात श्री. हर्षवर्दन बि.जे मा. उपअधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पुसंद (शहर) चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. सेवानंद वानखडे यांचे नेतृत्वात त्यांचे अधिनस्त पोलीस पथकाने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोहवा / २१०२ मनिषा वाघमारे. पो.ना प्रशांत स्थुल हे करीत आहेत.



