सातारा :- घरगुती एलपीजी सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग आता बंधनकारक असून पहिला सिलेंडर घेतल्यानंतर 26 दिवस झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर बुकिंग करता येणार नसल्याचे बदल प्रणालीत बदल केले आहेत. नागरिकांनी नव्या बदलाची माहिती घ्यावी असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे. मध्यपूर्व आशियात इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम,इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीच्या विक्री अधिकारी व गॅस व पेट्रोल वितरकांची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यात पेट्रोल,डिझेल तसेच एनपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल असे संबंधित गॅस वितरण कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर, गॅस वितरकांच्या कार्यालयात अनावश्यक गर्दीं टाळावी अफवांवर विश्वांस ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच गॅस एजन्सीच्या साठ्यांची नियमित तपासणी केली जाईल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनवाश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असेही जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने म्हणाल्या आहेत.*
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
