राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या तालमीत ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना
६ मार्च २०२६ रोजी सकाळी साहेबराव म्हसे यांच्या नेतृत्वात राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची मिरवणूक दरम्यान काळ्या टोप्या घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त...

राहुरी प्रतिनिधी,
राहुरी:- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होऊन एक वर्ष झाले, पोलीस पथकाने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. विटंबना करणाऱ्या आरोपींना येत्या चार दिवसात अटक न झाल्यास तपासी अधिकारी, तत्कालीन डिवायएसपी व तहसीलदार यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असा सज्जड इशारा साहेबराव म्हसे यांनी दिला.
राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या तालमीत ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष झाले. पोलिस प्रशासनाने या घटनेचा अद्याप तपास केला नाही. या घटनेच्या निषेधार्थ दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी साहेबराव म्हसे यांच्या नेतृत्वात राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दरम्यान काळ्या टोप्या घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सदर मिरवणूक थेट तहसील कार्यालयासमोर नेण्यात आली. यावेळी साहेबराव म्हसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, विडंबना होऊन एक वर्ष झाले, महाराजांच्या मुर्तीची विटंबना करणारे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. प्रशासन आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे. येत्या चार दिवसात आरोपींना अटक न झाल्यास या घटनेतील तपासी अधिकारी, तत्कालीन डिवायएसपी व तहसीलदार यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असा इशारा साहेबराव म्हसे यांनी दिला.
यावेळी रविंद्र मोरे म्हणाले कि, महाराजांची विटंबना करणारे गांडूच्या अवलादी आहेत. हिम्मत असेल तर महाराजांची विटंबना आमच्या समोर करुन दाखवा, मग कळेल महाराजांचे मावळे काय करतात. ॲड. भाऊसाहेब पवार म्हणाले कि, पोलीस प्रशासनावर पालकमंत्री व सरकारचा दबाव असल्याचा आरोप पवार यांनी केला. निलेश जगधने म्हणाले कि, मुर्तीची विटंबना होऊन वर्ष झाले अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. या घटनेत तपासी अधिकारी संजय ठेंगे यांना सह आरोपी करण्याची मागणी जगधने यांनी केली. प्रसंगी विजय तमनर, देवेंद्र लांबे, बाळासाहेब गाढे, सचिन करपे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी राजूभाऊ शेटे, संदीप आढाव, सुनील हिवाळे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.



