जालना जिल्हा :- जालन्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य राखीव पोलीस बल नेहमीच मोलाची भूमिका बजावतात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या… महाराष्ट्र राज्यांच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाचा 78 वा वर्धापन दिन जालन्यात मोठ्या उत्साहांत आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने राज्य राखीव पोलीस मैदानावर आयोजित केलेल्या विशेष संचालनाने आणि थरारक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली दरम्यान जालना जिल्ह्यात अतिवृष्टी मध्ये मदत कार्यातही राज्य राखीव पोलीस दलाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे जालना जिल्हाधिकारी आमिषा मित्तल म्हणाल्या… जालना राज्य राखीव पोलीस बलाच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या सेवाभावी धैर्यशील कार्याचे विशेष कौतुक जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. जालन्यात राज्य राखीव पोलीस बल 78 वा वर्धापन दिन शुक्रवारी दिनांक 6 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल मुंबई आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र तसेच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम मिन्नू समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक -3 उपस्थित होते.*
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
