Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

यावल–बोरावल रस्त्यावर दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,

यावल : यावल तालुक्यातील पिंप्री गावातील 39 वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (6 मार्च) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्री येथील रहिवासी नितीन राजू भोई हे दुचाकीने प्रवास करत असताना यावल–बोरावल रस्त्यावर शब्बीर शेख यांच्या शेताजवळ त्यांची मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी नितीन भोई यांना तातडीने वाहनातून उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पिंप्री गावचे सरपंच रोहीदास पंढरी कोळी यांनी यावल पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या अपघातामुळे पिंप्री गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button