अहो, एसपी साहेब शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी
संभाजी पुरीगोसावी सातारकर (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.


सातारा :- आज अनेक गंभीर स्वरूपाचे देखील विषय पोलीस ठाण्यात गुलदस्तात मिटतात, मात्र पळून जावुन विवाह केलेल्या मुलीने आईवर केलेला गुन्हा मात्र हा शाहुपुरी पोलिसांनी तथा दंडाधिकारी समोर नेसातारा शाहूपुरी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या श्रीमती. कविता प्रताप बर्गे (वय 50) यांच्या पळून जावुन विवाह केलेल्या मुलीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जन्मदात्या आईने दिलेल्या धमकीवरून शाहुपुरी पोलीस ठाण्यात आईवरच फिर्याद दाखल केली होती. तू माझ्यासमोर हजर हो, नाय आलीच तर मी आत्महत्या करून पोलीस ठाणेत चिठ्ठी देईन अशी आई कविता बर्गे यांनी मुलीला फोनवरून सांगितले होते. त्याच अनुषंगाने मुलगी प्राजक्ता विशाल चव्हाण (वय 27) ही साताऱ्यात येवुन आपल्या आईला भेटल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आईविरोधात गुन्हा दाखल केला होता. कविता प्रताप बर्गे या पुरीगोसावी यांच्या चुलत बंधूंच्या त्या सासूबाई होत्या. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक मुलीने गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात केला होता. त्याच अनुषंगाने शाहुपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी वारंवार फोन करून पोलीस ठाण्यात हजर रहा असे सांगत होते. मात्र मुलीने दाखल केलेली फिर्यादी इतकी गंभीर स्वरूपाची नव्हती, मात्र पुरी गोसावी यांच्या सासुबाई असल्यामुळे हा विषय पोलीस ठाण्यात मिटेल असा अंदाज पुरीगोसावी यांना होता. त्या अनुषंगाने अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. मात्र मुलीच्या फिर्यादीवरून शाहूपुरीच्या पोलिसांनी हा विषय थेट दंडाधिकारी यांच्यासमोर नेला, आज अनेक गंभीर स्वरूपाचे विषय हे पोलीस ठाण्यात मिटतात त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्याशी मी संपर्क केला होता. की हा विषय पोलीस ठाण्यातच मिटावा असे त्यांना मी कळवले होते. मात्र त्यांनीही संबंधित नोटीस वर सही करून पोलीस कर्मचाऱ्यांना दंडाधिकारी या ठिकाणी यांना हजर करण्याचे आदेश जारी केला. मात्र शाहूपुरी च्या पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल पुरीगोसावी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या पोलीस निरीक्षकाबद्दल पुरीगोसावी यांनी थेट याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळविले आहे.



