धर्मराज नगर येथे भाजपाचे अधिकृत उमेदवार यांची पदयात्रा संपन्न*
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : नामदेव मेहेर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:- दि.31 डिसेंबर 2025रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26 च्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पार्टीचे श्री सुरेश तात्या म्हेत्रे सौ. सोनम विनायक मोरे सौ शितल जितेंद्र यादव श्री गणेश दत्तात्रेय मुळेकर यांना अधिकृत उमेदवारी म्हणून जनसेवेची संधी मिळाली आहे देव देश धर्म संस्कृती बाबत कटिबद्ध राहून हे उमेदवार काम करतील असा विश्वास पिंपरी चिंचवड शहराच्या श्वासात विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपच्या कमळ धारी उमेदवारांना निवडून द्या असे आव्हान करण्यात आले
धर्मराज नगर गल्ली नंबर
एक दोन आणि तीन या प्रभागामध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार यांचा जनसंवाद यात्रा संपन्न झाली यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश तात्या म्हेत्रे गणेश शेठ मळेकर सोनम ताई मोरे शितलताई यादव आणि यांचे कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन मतदार राजाचा आशीर्वाद घेतला अनेक नडी अडचणी समजून घेतल्या यावेळी त्यांच्या पदयात्रेत कार्यकर्ते महिला मंडळी तरुण कार्यकर्ते लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ही जनसंवाद यात्रा सायंकाळी 5.30चालू झाली आणि रात्री 8.30 पर्यत चालू होती.




