Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

जालन्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ५ गुन्हे उघड*

*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; रोख रकमेसह दागिने हस्तगत*

जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके

जालना :जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे जालना तालुक्यातील ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

नेमकी घटना काय?
नोव्हेंबर २०२५ मध्ये योगेशनगर भागातील रहिवासी रमेश हिरामण वाघ यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे दागिने आणि ७ हजार रुपये रोख चोरून नेले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
अशी झाली अटक:
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत असताना, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, योगेशनगर येथील चोरी भारतसिंग कपुरसिंग बावरी (वय २६, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना) याने त्याच्या साथीदारासह केली आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचून भारतसिंगला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली.
५ गुन्ह्यांची दिली कबुली:
आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने जालना शहरातील खालील भागातील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे:
१) योगेशनगर येथील घरफोडी.
२) गोकुळधाम, इंदेवाडी परिसरातील घरफोडी.
३) लक्ष्मीनगर भागातील घरफोडी.
४) राजपूतवाडी भागातील लोखंडी सळ्यांची चोरी.
५) जिजामाता कॉलनी, सदर बाजार भागातील लोखंडी सळ्यांची चोरी.


मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी आरोपीकडून ६,००० रुपये रोख आणि २५,००० रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी तालुका पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. त्याचे इतर साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
यांनी केली कारवाई:
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, योगेश उबाळे, सचिन खामगळ, राजेंद्र वाघ आणि स्थानिक गुन्हा शक्य अंमलदार .रामप्रसाद पव्हरे. गोपाल गोशिक. प्रभाकर वाघ. रमेश राठोड. लक्ष्मीकांत आडपे. सागर बाविस्कर. इरशाद पटेल दत्ता वाघुंडे .अशोक जाधवर त्यांच्या पथकान यशस्वीरित्या कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button