
आळंदी :- मतमोजणी प्रक्रिया बाबत प्रशासकीय अधिकारी माधव खांडेकर यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे.
त्यानुसार आळंदी नगरपरिषद निवडणूक मतमोजणी प्रक्रिया बाबत मतमोजणी प्रक्रिया 21 12 2025 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे संपूर्ण प्रक्रिया नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये पार पाडणार आहे तसेच मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन कडून तयारी करण्यात आली आहे या प्रक्रियेसाठी एकूण 38 अधिकारी आणि 15 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे मतमोजणी ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबट ठेवण्यात आलेला आहे केवळ अधिकृत पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार असून अधिकारी व कर्मचारी असे एकूण 53 जणांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलेले आहे निवडणूक निर्णय अधिकारी दिलेल्या सूचनेनुसार मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये शांतता राखण्याचे आव्हान नागरिकांना आणि उमेदवारांना च्या प्रतिनिधींना करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री जयराज देशमुख यांनी विशेष सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले आहे त्याचबरोबर नियमांचं काटेकोरपणे पालन केले जाणार असून पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या या मतमोजणीमुळे तसेच सुमारे 20 दिवसाच्या विलंबाने निकाल लागणार असणार आहे. मुळात निकालाची उत्सुकता शिगेला असताना कायदा आणि सुव्यवस्था जबाबदार पणे पार पाडण्यासाठी आळंदी पोलिस आणि आळंदी नगरपरिषद तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे तसेच सर्व यंत्रणा यांना प्रशिक्षण देत जबाबदारी ची भूमिका प्रशासकीय अधिकारी पार पाडणार आहेत.



