(सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यांत मुरूम येथील दोन सख्या बहिणींच्या भीषण अपघातानंतर आता लहान भावाचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे एकाच कुटुंबातील तिन्ही संख्या भावंडांचा मृत्यू झाल्याचे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे मुरूम येथील बोडरे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी अपघातामुळे फलटण तालुक्यांतून हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी मोरगांव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कु. सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय 17) कु. अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय 15 ) दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडके वय (12) यांचा पुण्यात उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यामुळे बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या ह्रदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यांतील मुरूमसह संपूर्ण पंचक्रोशीत देखील शोककळा पसरली आहे. बारामती तालुक्यांतील मुर्टी येथील मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटी वरून निघाले होते. यावेळी चौधरवाडी फाट्यानजीक त्यांच्या स्कुटीची आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली होती. या भीषण अपघातात सेजल व अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळी मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातामुळे मुरूम येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिन्ही सखे बहिणी भावंडे शिक्षण क्षेत्रात चांगलेच हुशार आणि सर्वांचे लाडके होते. या भीषण अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे उध्वस्त झाले असून संपूर्ण परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे. तीन निष्पाप जीवांचा झालेला दुर्दैवी अंत हा अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.*
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
