जालना प्रतिनिधी
जालना : पुणे शहरातून तडीपार असलेला आणि भोसरी परिसरात भरदिवसा जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जालना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. फारुख सत्तार शेख (वय २७, रा. देवमूर्ती, जालना) असे या आरोपीचे नाव असून, जालन्यातील जामवाडी परिसरातून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे लावला सापळा
जिल्ह्यातील आणि बाहेरील गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तशा सूचना दिल्या होत्या. या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पुणे येथून तडीपार असलेला एक इसम जालन्यात लपून बसला आहे. या माहितीची खातरजमा होताच एलसीबीच्या पथकाने जामवाडी भागात सापळा रचून फारुख शेख याला उचलले.
महिलेच्या गळ्यातील साखळी पळवल्याची दिली कबुली
आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने आपल्या एका साथीदारासह पुणे जिल्ह्यातील भोसरी (बालाजी नगर) येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पळवली होती. याप्रकरणी पुणे येथील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७०/२०२६ कलम ३०९(४) नुसार गुन्हा दाखल आहे.
पुणे पोलिसांच्या स्वाधीन
जालना पोलिसांनी या कारवाईची माहिती पुणे पोलिसांना दिली असून, आरोपीला पुढील तपासासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास आणि रमेश काळे यांच्या पथकाने केली आहे.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
