पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. पारगांव (कारखाना) पोलीस ठाण्याचे धडाकेबाज कामगिरी तांत्रिक तपास व विशेष पथकांच्या मदतीने 1. 80 लाखांचे 12 गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेवुन मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. पारगांव (कारखाना) पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्यातून विशेष कौतुक होत आहे. पारगांव (कारखाना) पोलीस ठाण्याकडून सन 2025-2026 या कालावधीमध्ये ते आजपर्यंत तक्रारदारांचे गहाळ झालेले एकूण 37 मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी पारगांव पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पथक तयार करून मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरचे मोबाईल हे आज रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि पारगांव (कारखाना) पोलीस ठाण्याकडील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.*
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
