Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर – महापौर रवि लांडगे*
पिंपरी चिंचवड

नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर – महापौर रवि लांडगे*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comApril 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन….*

*स्थानिक रहिवाश्यांना मिळणार विविध सोईसुविधा…*

*पिंपरी, दि. ०६ एप्रिल २०२६ :-* शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हा अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र. २३० व २३१ मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे,माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका बोऱ्हाडे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय जाधव, बाळासाहेब लांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच निलेश बोराटे,आतिश बारणे, शिवाजी बारणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असताना येथील नागरिक,युवक-युवती, महिला तसेच लहान मुलांसाठी सुसज्ज सार्वजनिक जागेची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना केवळ मनोरंजन व विरंगुळ्याचीच नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठीही मोठा आधार मिळणार आहे.असेही त्यांनी सांगितले.

या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून एस.एस. आर्किटेक्टस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

*अशा आहेत सोईसुविधा….*

या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पामध्ये नागरिकांसाठी व्हॉलीबॉल कोर्ट (४८० चौ.मी.), योगा कोर्ट (१६० चौ.मी., बॅडमिंटन कोर्ट (३५० चौ.मी.), सॅन्ड पिट (जंगल जिम) (१०० चौ.मी., बहुउद्देशीय मैदान (१५५० चौ.मी.), अम्पिथिएटर, पादचारी मार्ग , बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग यांसारख्या विविध आधुनिक व उपयुक्त सुविधा विकसित करण्यात येणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकर्षणाचे व उपयुक्ततेचे केंद्र ठरणार आहे,

स्थानिक तरुणांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सार्वजनिक परिसर उपलब्ध होणार असल्याने सामाजिक संवाद, आरोग्यवर्धन आणि सकारात्मक वातावरण निर्मितीस चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराचा केवळ भौतिक विकास होणार नसून, आरोग्य, क्रीडा, सामाजिक एकात्मता आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुविधा, आनंद आणि सक्रियता वाढविणारा हा प्रकल्प मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरासाठी विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ – महापौर रवि लांडगे*
Next Article वाई पोलिसांनी केबल चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; एकुण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत !
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

By newsexpress18pune@gmail.comApril 15, 20260

प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे *आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज* *पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६*:…

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.