काळेवाडी,:- पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे ‘विराट हिंदू संमेलन’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. हिंदू एकता व संस्कृती रक्षण या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने करण्यात आली. विविध मार्गांवरून निघालेल्या या शोभायात्रेत भगवे ध्वज, ढोल-ताशा पथके तसेच धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, काळेवाडी प्रखंड यांच्या वतीने सुरक्षेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यात आली.
या संमेलनामुळे समाजामध्ये एकता वृद्धिंगत होण्यास तसेच सांस्कृतिक जाणीव वाढीस लागण्यास मदत झाल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

