Site Logo
पुणेमहाराष्ट्र

बारामतीच्या दाम्पत्यात संशयातून भीषण अंत; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

बारामती प्रतिनिधी

 

बारामती :– येथील पती-पत्नीच्या नात्यात संशय आणि कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना कर्नाटकात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य मूळचे बारामतीचे असून त्यांचा चार वर्षांचा संसार होता. पती अक्षय याने पत्नी शैला हिच्यावर विवाहबाह्य संबंधांचा संशय घेतल्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या पार्श्वभूमीवर देवदर्शनाचा बहाणा करून पत्नीला कर्नाटकात नेऊन त्याने ही भीषण कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपी पती अक्षय याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अनैतिक संबंधांच्या संशयातून घडणाऱ्या अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक वादांचे भीषण परिणाम अधोरेखित झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button