अशोक खरात प्रकरण गाजलं; सुषमा अंधारे यांची रूपाली चाकणकरांवर कारवाईची मागणी**
प्रतिनिधी मुंबई

मुंबई :- महाराष्ट्रात सध्या अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत, चाकणकर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी नार्को टेस्ट करण्याचीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणात दीपक केसकर यांचीही चौकशी व्हावी, असे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
या प्रकरणाच्या तपासावर नाशिक पोलीस आणि विशेष तपास पथक (एसआयटी) लक्ष ठेवून असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



