स्लम ते स्मार्ट होम: साईनाथ नगरमध्ये २५२ घरांची चावी वाटप*
प्रतिनिधी :- पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील साईनाथ नगर, नेहरूनगर येथे एसआरए प्रकल्पांतर्गत बांधलेल्या आर.के. प्लाझा इमारतीतील 252 सदनिकांचे चावी वाटप उत्साहात पार पडले. 27 मार्च 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आणि माजी महापौर हनुमंतराव भोसले यांच्या हस्ते लाभार्थींना घरांचा ताबा देण्यात आला.

या वेळी नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे), नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल मासुळकर तसेच प्रकल्पाचे विकासक राजेंद्र कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सदनिकांसोबतच गॅस शेगडी, गिझर, वॉशिंग मशीन, पाणी फिल्टर, वायफाय व केबल कनेक्शन अशा आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच अशा प्रकारे सर्व सोयींनी सुसज्ज घरे देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नगरसेवक राहुल भोसले यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाद्वारे ५ हजारांहून अधिक नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी नव्या घरासाठी लाभार्थींना शुभेच्छा दिल्या, तर हनुमंतराव भोसले यांनी घरांची स्वच्छता व देखभाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विकासक राजेंद्र कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.



