पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय खळबळ: सचिन काळभोर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ‘मातोश्री’वर भेट”
प्रतिनिधी :- पिंपरी

पिंपरी :-पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि माजी चिटणीस सचिन काळभोर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन खाजगी कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काळभोर यांना भाजपकडून तिकीट देण्यास लांडगे यांनी विरोध केला होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काळभोर यांनी अर्ज दाखल केला, मात्र त्या नियुक्तीलाही लांडगे यांनी विरोध दर्शवला.
या पार्श्वभूमीवर काळभोर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. येत्या काळात भाजपमधील काही कार्यकर्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



