आम्ही यवतमाळकर ,ज्येष्ट नागरिक मंडळ व स्व.माधूरी पद्माकर महाजन सेवाभावी संस्था यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यातील अविकसीत क्षेत्रातील समाजाची सेवा देणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी विविध पुरस्कारांने सन्मानित करण्याचा पायंडा पाडला आहे ,त्याचाच एक भाग म्हणून पुसद येथील माणुसकिची भिंत चे संस्थापक गजानन जाधव व त्यांची टिम दररोज ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात सकाळ संध्याकाळ गरजू लोकांना अन्नदान,फळवाटप व शहरातील नैसर्गिक आपत्तीत झळ पोहचलेल्या अपादग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणारी,भाउबीज, रक्षाबंधन सारखे सणात अनाथ व गोरगरिब स्त्री पुरुषांना कपडे लत्ते अहेर करून मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था माणूसकीची भिंत करित आलेली आहे.त्यांचे कार्याची दखल घेउन त्यांना 2022 चा भगीरथ पुरस्कार व दहा हजारार रुपये बक्षीस माणुसकीच्या
भिंतीला जाहीर झाला होता पण 2022 भगीरथ पुरस्काराचा कार्यक्रम लॉकडाऊन असल्यामुळें तो पुरस्कार या वर्षी 16 मार्च 2 026 रोजी माणुसकीची भिंत सदस्यांना देण्यात आला.
2022 ला पुरस्काराचे दहा हजार रूपये संस्थेच्या खात्यातत टाकले होते भेटलेल्या पुरस्कारा च्या पैशाने 2022 मध्ये पुसद परिसरातील हजारो गरजवंतांना लॉकडाऊन मध्ये किराण्याची खूप आवश्यकता होती ती पाहता संस्थेने त्या पैशाच्या किटा वाटप केल्या हे मोठ्या प्रमाणात किटा वाटपाचे काम पाहता नंतर पुसद परिसरातील दात्यांनी माणुसकीच्या भिंतीला किराणा किट करता मदत केली जवळपास 45 क्विंटल गहू 30 क्विंटल तांदूळ व तेल चटणी मीठ हळद इतर किराणा *अन्नदान किट* वाटप करण्यात आल्या होत्य
*निस्वार्थाने सुरुवात केली तर कोणतेच काम छोटे राहत नाही*.आपणही सढळ हाताने माणूसकीची भिंतला हातभार लावीत राहील्यास अन्नदानाचे कार्यात कधीही खंड पडणार नाही असे भावोद्गार अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केलेत
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
