तलवार बाळगून दहशत निर्माण करणारा युवक जेरबंद; तीन धारदार तलवारी जप्त**
प्रतिनिधी :- जालना

जालना :- जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून तीन धारदार व तीक्ष्ण तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक **अजय कुमार बन्सल** यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक **पंकज जाधव** यांनी पथक तयार करून ही कारवाई केली.
दिनांक 11 मार्च 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की **अनिल किशोर मोरे (वय 20, रा. बोधलापुरी ता. घनसावंगी, सध्या संजय नगर जालना)** हा संजय नगर परिसरात तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो राहत्या घराजवळ आढळून आला.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून सुमारे **रु. 5300 किंमतीच्या तीन धारदार तलवारी** जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी आरोपीविरुद्ध **कदीम पोलीस ठाणे, जालना** येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने केली.



