Site Logo
महाराष्ट्रगुन्हेगारी

सोलापूर हादरले, सुखी संसाराला कुणाची नजर लागली, पती-पत्नीने संपविले जीवन, प्रियकर पत्नीवर करत होता प्रेम!

सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

सोलापूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली असावी असं म्हणण्यातही काय वावगे ठरणार नाही. सोलापूर मध्ये पती-पत्नीने जीवन संपविले आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासांतून प्रियकर पत्नीवर एकतर्फीं प्रेम करत होता. तर पती सोमनाथ याला तू तुझ्या बायकोला सोड, माझे तिच्यावर प्रेम आहे. तू जर तिला सोडलं नाही, तर तुला मारून तिला पळवून नेईल अशीही धमकी प्रियकरांने दिली होती. या घटनेमध्ये चांगल्या आणि सुखी संसाराला नजर लागली

अखेर प्रियकरांच्या त्रासाला कंटाळून पती सोमनाथ धानोप्पा पाटील आणि पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील या दोघांनी जीवन आपले जीवन संपविले आहे. मात्र आत्महत्या कर्त्यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये विजयपूर कर्नाटक येथील अभिषेक दत्तात्रेय कोरे या व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट वरून अभिषेक कोरे यांनी विवाहित श्रीदेवी सोमनाथ पाटील हिच्याशी ओळख निर्माण केली होती. ओळखीचे रूपांतर त्यांचे प्रेमात झाले यामध्ये दोन वेळा भेटी झाल्या होत्या,

यात अभिषेकचे विवाहित श्रीदेवी सोमनाथ पाटील वर प्रेम निर्माण झाले, त्यानंतर श्रीदेवीला तो एकतर्फीं प्रेमातून बदनामी,धमकी देत होता. सोमनाथ पाटील व श्रीदेवी पाटील या दाम्पत्याला दोन मुली आहेत त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. दरम्यान या दांपत्याच्या आत्महत्येने दोन मुली पोरक्या झाल्या आहेत सोलापुरांतून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक दत्तात्रय कोरे याला अखेर ताब्यात घेतले आहे. कोरे याच्यावर सांगोला येथे बलात्कारांचा गुन्हा दाखल आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहेत.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button