त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त, गोविंद गाडे व हिना तांबोळी यांची निवड नियुक्ती जाहीर. ———
प्रतिनिधी पिंपरी


पिंपरी:- न्यायमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा १२८ वा जयंती महोत्सव दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी, भिमसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई पुणे रोड पिंपरी पुणे 18 येथे साजरा करण्यात आला.यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्याग मूर्ती माता रमाई यांच्या प्रतीमेला या सामाजिक संघटनेचे संस्थापक — आयुष्य.भिमरत्न ,प्रा.बी.बी.
शिंदे.यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कवि, गायक,शाहीर, आयुष्य.गोविंद दत्तू गाडे यांची या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड नियुक्ती करुन तसे प्रमाणपत्र देण्यात आले.
आणि याच सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या महिला अध्यक्षा म्हणून आयुष्य.हिना
फिरोज तांबोळी यांची निवड नियुक्ती करुन तसे प्रमाणपत्र या सामाजिक संघटनेचे संस्थापक — भिमरत्न,प्रा.बी.बी.शिंदे.यांचे हस्ते देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी या सामाजिक संघटनाचे प्रमुख पदाधिकारी सह संघटक आयुष्य.रामभाऊ ओव्हाळ, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी मधील प्रमुख वरीष्ठ उपाध्यक्ष आयुष्य. परमेश्वर जगताप,तर पिंपरी चिंचवड शहर महिला कार्यकारिणीतील महिला महा सचिव -आयुष्यमती सावित्रीबाई शिंदे, सदस्य – आयुष्यमती – विमल शरद पवार , उपस्थित होते.
तर याशिवाय फुले,शाहु, आंबेडकर चळवळीतील पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख नेते -आयुष्य.प्रा.
युवराज भास्कर तीकटे, आयुष्य.बाबासाहेब विठ्ठल वाघमारे, आयुष्य.रामभाऊ ठोके, सद्दाम भाई शेरव, फिरोज लालासाहेब तांबोळी, आयुष्य.दामोधर चंदनशिवे, आयुष्य.भालेराव साहेब, आयुष्य.रामलिंग धावारे, इत्यादी प्रमुख अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या गाडे साहेब आणि हिना तांबोळी यांच्या निवडीचे सर्व समाज बांधवांकडून अभिवादन करण्यात येत आहे.



