दि..17 जानेवारी शनिवार रोजी वसंतराव काळे पब्लिक स्कुल, लिटल चॅम्प्स् प्रि स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन “प्रतिभा दर्शन” मुंकुदराज सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी लिटल चॅम्प्स् प्रि स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे मॅडम व डॉ. अनघा पाठक मॅडम, डायरेक्टर श्री विश्वाई आयुर्वेद व पंचकर्मा हॉस्पिटल अंबाजोगाई या उपस्थित होते. तर वसंतराव काळे पब्लिक स्कुल वार्षिक स्नेहसंमेलनास दुपारच्या सत्रात अंबानगरीचे श्री शरद जोगदंड सर,पोलीस निरिक्षक अंबाजोगाई सिटी,पोलिस स्टेशन, दि.ना. फड सर प्राचार्य, श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांदुर, संचालक केदार वाघमारे सर,व्यवस्थापक, सुमंत केदार सर, संस्थेचे सचिव डॉ.नरेंद्र काळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार जाधव सर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडा, गणेश वंदना, ताकुंबा, लावणी, भक्तीमय गीत, भारूड, महिला सशक्ती व सबलिकरण , आदिवासी नृत्य सादरीकरण, भारतीय आयकॉन भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू, अब्दुल कलाम, महात्मा गांधीजीं यांना वंदना देणारी किट सादर करत उपस्थित सर्वांच्या मनात प्रखर राष्ट्रभक्ती जागरूक केली, मराठी गीतासह अनेक हिंदी गीते सादर करून चिमुकल्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. डॉ. नरेंद्र काळे सर व डॉ हर्षा काळे मॅडम यांनी चिमुकल्या बरोबर धर्मेंद्रजी यांना स्मृतींना उजाळा देण्यासाठी सादर होत असलेल्या गीतामध्ये नृत्य सादरीकरण हे मुख्य आकर्षण राहिले . यावेळी शाळेने अनेक सामाजिक विषय आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनातून मांडत सभागृहातील सर्वांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. अनघा पाठक मॅडम व प्रियंका टोंगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग, आरोग्य़, प्रयत्ऩ, संतुलित आहार व अभ्यासाचे महत्व़ व सध्याच्या युगात उपलब्धता विविध क्षेत्रातील करिअरची संधी या बदद़ल मार्गदर्शन केले तर प्रियंका टोंगे मॅडम व शरद जोगदंड सर यांनी टिव्ही, मोबाईल पासुन दुर राहत खेळाला महत्व़ देण्यास सांगितले व भविष्यातील राष्ट्राच्या उभारणीसाठी जागरूक व संवेदनशील नागरिक या शाळेच्या माध्य़मातून घडावेत असे विचार मांडले. यावेळी शाळेचे प्राचार्य ओवेन वेल्था सर व प्रिती मॅडम यांनी शाळेचे वार्षिक अहवाल सादर केले. तर संस्थ़ेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे सर यांनी सर्व आव्हानांना सामोरे, जाणारे बहुआयामी विद्यार्थी तयार करणे हेच आमचे ध्येय असुन आतापर्यंत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस व इजिंनिअरींग, विविध क्षेत्रात प्रवेश मिळवता आला याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे असे सांगितले. माझी शाळा सामान्यातील सामान्य़ माणसाला परवडेल हा माझा संस्था चालवताना मानस आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती साठे मॅडम व शुभम सर चि. नैतिक काळे, अक्षरा पवार व पृथ्वीराज गायकवाड या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता अंकुशे मॅडम, नैतिक काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्ऩ केले.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वसंतराव काळे पब्लिक स्कुलचे “प्रतिभा दर्शन” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न्…
Previous Articleग्रामपंचायतला मिळणारा निधी विकास कामे करण्यासाठी खर्च होतो का❓
