Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»भाजपमध्ये तिकीट वाटपावरून असंतोषाचा भडका; ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप*
पिंपरी चिंचवड

भाजपमध्ये तिकीट वाटपावरून असंतोषाचा भडका; ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comDecember 30, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत तिकीट वाटपावरून मोठा असंतोष उफाळून आला आहे. शहर भाजपच्या कार्यकारिणीतच निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळी वेठीस धरून ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य दिले जात

असल्याचा गंभीर आरोप भाजपमधीलच कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट जाहीर करून जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने भाजपमध्ये खदखद वाढली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून देण्यासाठी रस्त्यावर उतरले. आंदोलने, मोर्चे, आंदोलनात गुन्हे दाखल होण्याची जोखीम पत्करत त्यांनी पक्षसंघटन मजबूत केले. मात्र, त्याच कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या वेळी डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी तीव्र झाली आहे.

निगडी येथील भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली. रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित भूखंडांचे क्षेत्र कमी करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणे, निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलनाचा इशारा देऊन रस्त्यांची दुरुस्ती करून घेणे, पीसीएमसी कॉलनीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणे, अण्णा भाऊ साठे वसाहतीतील नागरिकांसाठी एसआरए प्रकल्पाची मागणी करणे, अशी अनेक आंदोलने त्यांनी केली.

याशिवाय यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा केंद्र, यमुना नगर व भोसरी रुग्णालयात वैद्यकीय सुविधा, आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुरू करणे, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा, मेट्रो स्टेशनच्या नामकरणाबाबत आंदोलन, पाणी वाया जाण्याविरोधात कारवाईची मागणी, पादचारी भुयारी मार्ग, विद्युत दाहिनी सुरू करणे, घरकुल प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे, मालमत्ता कर दंड रद्द करण्यासाठी आंदोलन – अशी असंख्य सामाजिक व नागरी कामे त्यांनी केली आहेत.

इतके करूनही प्रभाग क्रमांक १३ मधून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने “सामान्य कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळतो का?” असा सवाल उपस्थित झाला आहे. नवीन पक्षप्रवेश केलेल्या ‘आयात’ उमेदवारांना तिकीट देऊन जुन्या कार्यकर्त्यांना केवळ निष्ठेच्या गप्पा देत गप्प बसवले जात असल्याची भावना शहर भाजपमध्ये पसरली आहे. या पार्श्वभूमीवर “भविष्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस न्याय देतील का?” असा थेट प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात असून, तिकीट वाटपाचा हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, १ कोटी ३० लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त; तस्करी प्रकरणी एकास अटक…
Next Article लोकशाही सक्षमीकरणासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचा नववर्षात संकल्प करा – आयुक्त श्रावण हर्डीकर….*
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

By newsexpress18pune@gmail.comApril 16, 20260

ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:**…

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.