Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

निगडीत मनसेचा रणशिंगनाद! चिखले दाम्पत्याच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा भव्य शुभारंभ

प्रतिनिधी :- पिंपरी

 

पिंपरी (प्रतिनिधी): निगडीच्या राजकारणात पुन्हा एकदा परिवर्तनाची चाहूल! जनतेच्या विश्वासावर उभे असलेले, विकासाला गती देणारे आणि सेवाभावाला प्राधान्य देणारे मनसेचे खंदे नेतृत्व श्री. सचिन तुकाराम चिखले आणि सौ.अश्विनीताई सचिन चिखले–मराठे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा भव्य आणि दणदणीत शुभारंभ सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी निगडी येथील दुर्गामाता मंदिर, मनसे जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आला.या प्रचार शुभारंभाची सुरुवात उत्साहात करण्यात आली असून, यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण वर्ग तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात मनसेमय वातावरण निर्माण झाले होते.

‘कार्यकर्त्यांची ऊर्जा, नागरिकांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास’ या त्रिसूत्रीमुळे हा शुभारंभ केवळ कार्यक्रम न राहता, मनसेच्या विजयाची नांदी ठरला. सचिन चिखले हे मनसेचे शहराध्यक्ष, गटनेते व अनुभवी नगरसेवक म्हणून ओळखले जातात. तर सौ. अश्विनीताई चिखले–मराठे या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या मनसे नगरसेविका असून, त्यांनी आपल्या निर्भीड, स्वच्छ आणि ठाम भूमिकेने स्वतंत्र नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे. सत्तेपेक्षा सेवा, शब्दांपेक्षा काम आणि आश्वासनांपेक्षा परिणाम हेच या नेतृत्वाचे बळ आहे. “अनुभव + विश्वास + कार्य = निश्चित विजय” या सूत्रावर आधारित चिखले दाम्पत्याचे नेतृत्व प्रत्येक घरापर्यंत विकास, प्रत्येक समस्येला उत्तर आणि प्रत्येक नागरिकासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प घेऊन मैदानात उतरले आहे.
यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले, “जनतेची उपस्थिती हीच आमची खरी ताकद आहे. निगडीच्या विकासासाठी मनसेचा रेल्वे इंजिन थांबणार नाही. हा शुभारंभ जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ऐतिहासिक ठरला आहे.” मनसेची अधिकृत निवडणूक निशाणी ‘रेल्वे इंजिन’ ही केवळ चिन्ह नसून, विकासाच्या वेगवान प्रवासाचे प्रतीक आहे. या इंजिनाला आता जनतेची साथ मिळाल्याने परिवर्तनाची गती अधिक वेगवान होणार, हे निश्चित! या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसेप्रेमी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button