Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

अहो, ठाणेदार जरा दमानं घ्या, यवतमाळ जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांने स्वीकारले, 1 लाख रुपये, एसीबीकडुंन पोलीस ठाण्यात बेड्या!

(यवतमाळ जिल्हा) प्रतिनिधी.

 

यवतमाळ :- प्रशासकीय वर्तुळात मग ते पोलीस खाते असो, किंवा महसूल विभाग लाच घेण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या आठवड्याभरांत एसीबीने केलेल्या विविध कारवायांमध्ये लिपिकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. आता तर पोलीस ठाणेतील एका ठाणेदारांसह 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नरेश रमेशराव रणधीर (वय 52) हे मूळचे अंमळनेर (जळगांव) येथील रहिवासी असून. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ते ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीवरून उधारीचे पैसे परत न दिल्याने एका व्यक्तीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी 3 लाखांची लाचेची मागणी थेट अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने तक्रारदाराकडे केली होती. त्यापैकी 1 लाख रुपये स्वीकारताना ठाणेदार महोदयांस अमरावतीच्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणेदार नरेश रणधीर यांच्यावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई ही अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिदे पोलीस उपाधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे स्वप्निल निराळे आणि त्यांच्या पथकांने यशस्वीरित्या पार पाडली.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button