मिरजेत दोन दुचाकी चोरट्यांना अटक चार दुचाकी हस्तगत, तीन गुन्हे उघडकीस, महात्मा गांधी चौक पोलिसांची कामगिरी!
सांगली जिल्हा ) प्रतिनिधी

सांगली :- मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिरज शहरांतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना दोन संशयित चोरीची दुचाकी विक्रीसाठी मिरज कोल्हापूर रोडवर राजपूत मंगल कार्यालयाजवळ पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस पथकांने तेथे सापळा रचून विनानंबर प्लेट दुचाकी थांबलेल्या आयुब अब्दुलरशीद मन्ना (वय 34) व संदीप सूर्यकांत येलूरकर (वय 38) रा. नम्रता कॉलनी बुधगांव तालुका मिरज) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तासात त्यांनी दिनांक 8 रोजी मिरजेत एका हॉस्पिटलच्या गेट समोरून दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पोलीस चौकशीत मिरज शहर मिरज ग्रामीण हद्द व कर्नाटकातील सदलगा परिसरांतून त्यांनी आणखीन तीन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरज पाटील करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संदीप शिंदे साहेब पोलीस उपनिरीक्षक सुरज गुरव सचिन कुंभार सुरज पाटील बसवराज कुंदगोळ मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण राजेंद्र हारगे चालक सतीशकुमार पाटील आदीं पोलिसांनी या कारवाई सहभाग घेतला.*



