क्राईम रिपोर्टर परमेश्वर कांबळे
**मुंबई:**राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांवरील हल्ले हे केवळ एखाद्या व्यक्तीवरील हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या तसेच शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा दबाव टाकण्याचे प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.
राज्य सरकार अशा घटनांकडे गंभीरपणे पाहत असून पत्रकारांना धमकावणाऱ्या किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कठोर इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. तसेच पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी आवश्यक संरक्षण आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार संघटनांनी या भूमिकेचे स्वागत केले असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.
न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
