प्रतिनिधी परमेश्वर कांबळे
**दापोडी (पुणे):** फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारू प्यायल्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
### घटनेची पार्श्वभूमी आणि गुन्हा दाखल
दिनांक २६ मे ते २८ मे २०२६ दरम्यान दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने काही लोकांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल घेत २९ मे २०२६ रोजी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ११४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम १०५, १२३, ११०, १२५, २७५, ३(५) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई), ६८, ८१, ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
### मृतांची नावे
प्राथमिक तपासानुसार विषारी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्या फुगेवाडी, दापोडी येथील १० नागरिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) पांडुरंग सखाराम फुगे (वय अंदाजे ५३ वर्षे)
२) अकबर अजिमखान पठाण (वय ४८ वर्षे)
३) राजेश शांताराम राजपूत (वय अंदाजे ५० वर्षे)
४) आनंद पांडेराव देसाई (वय अंदाजे ५३ वर्षे)
५) आनंद काशीनाथ निकाळजे (वय अंदाजे ६४ वर्षे)
६) भिमण्णा बसण्णा नागराल (वय २७ वर्षे)
७) अक्षय अशोक अवसरमल (वय २८ वर्षे)
८) सचिन रामचंद्र नेटके (वय ३६ वर्षे)
९) सुरप्पा मनप्पा बंगारी (वय ५५ वर्षे)
१०) राजू प्रकाश राठोड (वय ३४ वर्षे)
मृतांचे शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) करण्यात आले असून, पुढील रासायनिक तपासणीसाठी व्हिसेरा सी.ए. (C.A.) कडे पाठविण्यात आला आहे. त्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
### ५ जणांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरू
आरोपींनी तयार केलेल्या या विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे अन्य ५ जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी मेडीपॉईंट हॉस्पिटल (औंध) आणि वायसीएम हॉस्पिटल (पिंपरी) येथे दाखल करण्यात आले आहे.
**उपचार सुरू असलेल्यांची नावे:**
* सुभाष डिग्गीकर (वय ६६ वर्षे, रा. फुगेवाडी)
* चंदन रामबली कुमार (वय २६ वर्षे, रा. दापोडी)
* श्रीमंत शिवपुत्र कोळी (वय ५२ वर्षे, रा. फुगेवाडी)
* जितू मनोहर शेदतपुरी (वय ३१ वर्षे, रा. फुगेवाडी)
* प्रकाश उमाजी राठोड (वय ६५ वर्षे, रा. फुगेवाडी)
### मुख्य आरोपींना अटक; ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील ४ आरोपींना अटक केली:
१) कर्नेलसिंह तखतसिंह विरका (वय अंदाजे ७३ वर्षे, रा. संजय नगर, फुगेवाडी)
२) गुरमंगतसिंह कर्नेलसिंह विरका (वय अंदाजे ४५ वर्षे, रा. संजय नगर, फुगेवाडी)
३) योगेश रामचंद्र व्हानकडे (वय २३ वर्षे, रा. केशवनगर, मुंढवा)
४) राधेशाम हरिराम प्रजापती (वय ३५ वर्षे, रा. उरळीकांचन, पुणे)
या आरोपींना न्यायालयाने **दिनांक ०८/०६/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी** मंजूर केली आहे.
तसेच, काल (२९ मे) रोजी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे:
५) श्रीमती इंदरजीत कौर कर्नेलसिंह विरका (वय ६० वर्षे, रा. संजय नगर, फुगेवाडी)
६) कल्पेश अशोक आग्रवाल (वय २९ वर्षे, रा. खडकी, पुणे)
या दोघांना आज, दिनांक ३०/०५/२०२६ रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
### राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
या घटनेच्या गांभीर्याची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील समांतर कारवाई केली आहे. या विभागाने १) आकाश जाधव (रा. हडपसर), २) इरफान निसार कुरेशी (रा. पवार वस्ती, दापोडी) आणि ३) आर्यन संजय धोत्रे (रा. गोखलेनगर) यांच्यावर कडक कारवाई केली आहे.
दापोडी पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
