वारजे: पुणे शहर पोलीस कडून शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानां व हॉटेल्सवर कारवाईची मोहीम सुरू आहे. नियमांचे पालन आवश्यकच असले, तरी कारवाईदरम्यान काही ठिकाणी व्यावसायिकांशी दमदाटी, शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
छोटे दुकानदार व हॉटेल चालक रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना, “कायदा समजावण्याऐवजी धाक दाखवण्याची भाषा का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे :- प्रतिनिधी
वारजे पोलीस स्टेशन परिसरातील कारवाईनंतर काही व्यावसायिकांनी पोलिसांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “सामान्यांवर कडक कारवाई आणि प्रभावशाली आस्थापनांकडे दुर्लक्ष” अशी टीकाही नागरिकांकडून होत आहे.
“कायदा पाळलाच पाहिजे; पण कायद्याची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे,” अशी भावना आता पुणेकरांमधून व्यक्त होत आहे.