- डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानकोली ब्रिज परिसरात अपघातग्रस्ताच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी तुषार सुनील शिंदे (रा. १०३, मिलेनियम मार्केट, गोपीनाथ चौक, गरिबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम) यांचा दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अपघात झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येत असताना, मदतीसाठी आलेल्या इसमांपैकी एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली.
या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. ६४/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सपोनि मोरे, सपोनि लोखंडे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने तपास करत आरोपीचा शोध लावला.
तपासाअंती आरोपी सतीश दादा कोरे (वय २४ वर्ष, रा. आजदे गाव, डोंबिवली पूर्व) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ४२ ग्रॅम सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ तसेच सुहास हेमाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे,
( गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक) गहिनीनाथ गमे,(सहाय्यक पोलीस निरीक्षक) प्रशांत मोरे व सचिन लोखंडे यांच्या पथकाने केला आहे.
अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
