जामखेडमध्ये महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांच्या समस्यांचे जागीच निराकरण
आ.नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ...

अबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड :जामखेड येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा १ अंतर्गत शनिवार दि.७ मार्च रोजी भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांच्या महसुली अडचणींचे जागीच निराकरण करण्यात आले.
गावपातळीवरच शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा या महसूल समाधान शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
उत्पन्न, रहिवासी,जात व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रांचे वितरण भूमी अभिलेख सेवा : ७/१२ व ८अ उताऱ्यांतील त्रुटींची दुरुस्ती डिजिटल स्वाक्षरी उताऱ्यांचे वाटप आणि ई-मोजणी अर्ज प्रक्रिया
शेतकरी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नोंदणी व नोंदणीबाबत मार्गदर्शन
फेरफार प्रकरणे, अकृषिक NAपरवानगी आणि तुकडेबंदी कायद्याशी संबंधित तक्रारींचे निवारण
सामाजिक कल्याण सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा आढावा तसेच घरकुलांसाठी पट्टे वाटप प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
या शिबिरामुळे अनेक नागरिकांची महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामे एका ठिकाणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
अधिकाऱ्यांनी ऐकल्या तक्रारी
शिबिरात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी,तहसीलदार विजय चव्हाण,तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, गटविकास अधिकारी कवडदेवी मॅडम, उपनिबंधक राठोड तसेच गटशिक्षणाधिकारी कवडे सर उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला माजी जि.प. सदस्य जितेंद्र पालकर, प्रदीप पवार, रमेश पैठणे, रतन तारडे, रवींद्र गोल्डे, साईनाथ उकाडे, भगवान भोजने, श्रीराम नागरे, डॉ. गंगाधर पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच रामचंद्र भोजने आबा नेते, दीपक पांढरे, हरिश्चंद्र भोजने, मुख्याध्यापक परंजकर, गोपीनाथ जाधव, सुभाष हिवराळे, विलास राठोड, गंगाधर जामदरे, जाकीर सय्यद, सुरज पांढरे, पंकज मंडलिक, राम राठोड, अमोल डोईफोडे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.गावागावात अशा शिबिरांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होत असून शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.



