हळदी समारंभातुन चोरीस गेलेले सहा लाखांचे सोन्याचे दागिने राहुरी पोलीस स्टेशनच्या सांघीक कार्यामुळे नव दांपत्यास आज रोजी मा न्यायालयाच्या आदेशाने सुपूर्त…..
प्रतिनिधी राहुरी

राहुरी:- दि-06.11.2025 रोजी फिर्यादी नामे सौ शैला भास्कर सोनवणे वय-61 वर्षे रा-भवानी चौक, अमित किराणा दुकान बाजारपेठ , पेठ ता- पेठ, जि-नाशिक ह्या त्यांचे नातेवाईकांचे लग्न असलेने हळदी समारंभा करीता दि-06.11.2025 रोजी विठ्ठला लॉन्स राहुरी येथे आल्या होत्या. फिर्यादी यांचेकडे नवरी मुलीचे सुमारे साडेपाच लाख रुपये किंमतीचे दागीने संभाळण्यासाठी ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेले आहे वगैरे मा फिर्यादीवरुन राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 1194/2025 बीएनएस-303-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रथम दर्शनी सदर गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी गुन्हा करतांना कोणताही पुरावा ठेवला नव्हता तपासामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना राहुरी पोलीसांनी अहोरात्र मेहनत करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच लग्न समारंभातील फोटो पडताळणी केली. करुन तांत्रिक तपास करत असतांना त्याच दरम्यान अशाच प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेश येथील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडीया साँसी या गावातील अशाच लोक हे अशाच गुन्हे पुर्ण देशामध्ये करत असुन तपासामध्ये प्राप्त झालेला फोटोच्या अनुषंगाने बोडा पोलीस स्टेशन मध्य प्रदेश येथे जावुन माहीती घेतली असता सदर सोने चोरीचा आरोपीचे नाव क्रिश सिकंदर सिसोदिया असे असलेची माहीती प्राप्त झाली पंरतु सदर ठिकाणी छापा टाकल्यास सदर आरोपीच्या घरातील तसेच गावातील इतर लोक हे पोलीस पथकावर हल्ला करतात. त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन येथे जावुन तेथील उप विभागतील पोलीसांच्या मदतीने सदर गावात मोठ्या फौज फाट्यासह धाडसी छापा टाकुन गुन्ह्यात चोरीस गेलेले सुमारे 06 लाख रुपये किंमतीचे सोने दिनांक 25/11/2025 रोजी जप्त करण्यात आले होते.
सदर गुन्ह्याचा तपास मा श्री सोमनाथ घार्गे सो पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे सो, श्रीरामपुर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर सो श्रीरामपुर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात सपोनि सुदाम शिरसाट ,सफौ तुळशीराम गिते, सफौ काळे, पोहेकॉ सुरज गायकवाड, पोहेकॉ सतिष आवारे, पोना अशोक कुदळे, पोकॉ प्रमोद ढाकणे , सतीश कुराहडे,नदीम शेख,जयदीप बडे, योगेश आव्हाड, यांनी करून दिनांक 02/01/2026 रोजी मुदतीत दोषारोप पत्र मा न्यायालयात सादर करत
सदर सोने हे मा न्यायालयाचा आदेशाने फिर्यादी यांना आज दिनांक १७/०२/२०२६ रोजी सुपुर्त केले



