प्रशासनाला सूचना, सिंहगड रस्ता परिसरातील कामे त्वरित पूर्ण करा:- महापौर मंजूषा नागपुरे
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

पुणे :- पुणे शहरांत सिंहगड रस्ता परिसरांत विविध प्रकल्पांच्या कामासह प्रस्तावित कामांच्या ठिकाणी अचानक शनिवारी महापौर आदरणीय सौ. मंजूषा ताई नागपुरे यांनी अचानक भेट देवुन पाहणी केली असता. यावेळी त्यांनी सर्व असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या आणि सुरू न झालेली कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
महापौर मंजूषा नागपूर यांनी धायरी परिसरांतील लोकमत ऑफिस ते डीपी रोड (सावित्री गार्डन) या प्रस्तावित नवीन डीपी रोडच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने भेट देवुन पाहणी केली. मार्गामध्ये काही नागरिकांच्या जागांचा समावेश होत असल्याने संबंधित कुटुंबीयांशी चर्चा केली. याशिवाय त्यांनी वडगांव येथील नाट्यगृहाचे बांधकाम तसेच सनसिटी ते कर्वे नगरला जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान (काका) चव्हाण, कोमल नवले, जयश्री भूमकर,स्नेहलता कोल्हे, यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.*



