आळंदीत हाय व्होल्टेज ट्रॅफिक ड्रामा. प्रशासनाचा अचूक इलाज*
प्रतिनिधी आरिफ शेख

आळंदीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत मोठी अडचण होत होती.. मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असताना.चऱ्होली धानोरे येथील नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहतूक आळंदीत वळवण्यात आली, पर्यायाने आळंदीत मोठी वाहतूक कोंडी होत होती.तसेच येणाऱ्या एक जानेवारी विजयस्तंभ अभिवादन साठी येणारी वाहने याच नियोजन आणि नव्याने आळंदीत ट्रॅफिक जाम चे आव्हान,तसेच आळंदीतील सातत्याने होणारे लग्न सोहळे ,आणि आळंदी चाकण घाट पर्यायी मार्ग वापरण्यासाठी अवास्तव वाहतूक.यामुळे आळंदीकर जाम वैतागले असताना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या शी विचारविनिमय करत आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, यांचे कडून या हाय व्होल्टेज ड्राम्यावर अचूक इलाज करण्यात आला आहे.
आळंदीचे मुख्य रस्त्यावर बॅरिकेट आणि जाड दोरखंड चा वापर करत डिव्हायडर निर्माण करण्यात आले. त्यामुळे आळंदीच्या लांबच लांब रांगेमध्ये सुमारे 90 टक्के फरक पडल्याचे दिसून येत आहे. याबाबत आळंदी पोलीस स्टेशन प्रशासनाशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांनी सांगितले की,सुमारे 27 ते 33 पोलीस कर्मचारी केवळ वाहतूक नियंत्रणासाठी नेमले जात होते. सातत्याने या ना त्या कारणाने वाहतूक कोंडी होत असताना,काय करावे यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकासह प्रशासनालाही त्रास भोगाव लागत होता.केवळ वाहतूक नियंत्रण साठी सुमारे 30 चे आसपास पोलिस कर्मचारी नेमने ही बाब ही अवाजवी वाटत होती.तसेच बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे तर विनाकारण त्रास सहन करावा लागत होता.या सर्व बाबी व्यक्त होत असताना उपाय म्हणून सुमारे पाच हजारते 7 हजार रुपये किमतीत एक दोन खंड असे बऱ्याच दोरखंडाचा वापर स्व खर्चाने करत,सर्वच प्रमुख रस्त्यावर आणि आळंदीच्या मुख्य चौकात वाहतूक सुरळीत होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात त्यात यश आले आहे.अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे मार्फत देण्यात आली. यामुळे वाहतुक कोंडीत मोठा बदल झाले चे दिसून येत असून ,नागरिकांनी मात्र याबाबत समाधान व्यक्त केलेल आहे. चाकण वाहतूक कोंडी नंतर,आळंदी वाहतूक कोंडीचा क्रमांक लागत असताना.आळंदी पोलीस स्टेशनची ही कारवाई यश प्राप्त करताना दिसत आहे.





