Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

वाढदिवस साजरा करण्यासाठी केली होती लुटमार

जालना प्रतिनिधी

जालना :- दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी तक्रारदार निलेश अशोक अग्रवाल हे श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर, जालना येथे स्कुटीवर घरी जात असतांना रात्री सुमारे 11.30 वाजता अडवून मोटार सायकलवर आलेल्या चार आरोपीच्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत व तोंडावर नाकावर मारहाण करून गंभीर जखमी केले व 12,000/- रुपये लुटुन नेल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे चंदनझिरा येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणने बाबत चंदनझिरा पोलीसांना सुचना केल्या होत्या. चंदनझिरा पोलीसांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचे नेतृत्वात तपासास गती दिली व कोणतीही दिरंगाई न करता सखोल तपास सुरू केला. गुप्त बातमीदार नेमुण, गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा आरोपी नामे 1) बाळा जगन्नाथ पिंपराळे वय 19 वर्षे 2) दिपक भगवान निर्मल वय 20 वर्षे 3) अजय बबन पवार वय 18 वर्षे तीघे रा. द्वारकानगर नविन मोंढ्याजवळ जालना 4) विशाल धुराजी हिवाळे वय 22 वर्षे रा. हिंदनगर नविन मोंढा जवळ जालना यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हेगारांवर कडक कारवाई करत चंदनझिरा पोलिसांनी आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडे विचारपुस करता वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची आवश्यकत असल्याने घरी जात असलेल्या व्यापाऱ्यास चाकुचा धाक दाखवुन लुटमार केली असल्याचे आरोपींनी सांगीतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकों अशोक जाधव हे करीत आहेत.

आरोपींनी वाढदिवस साजरा करण्यासाठी व मौजमस्ती तसेच नशापाणी करण्यासाठी सदर जबरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन हुल्लडबाजी करण्यासाठी गंभीर गुन्हा केल्याने तरुणाई चुकीच्या दिशेने जात असल्याचे हे गंभीर वास्तव समोर आले आहे. तरुणाईने गुन्हेगारीकडे वळणे ही गंभीर बाब आहे. नशेच्या आहारी जाऊन गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील आणि अशा प्रवृत्तींना मुळापासून उखडून टाकले जाईल. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना मुळापासून आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर व निर्णायक कारवाई करण्यात येणार आहे. जालना शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून सामान्य नागरिकांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा ठाम संदेश यावेळी पोनि पवार यांनी दिला आहे.

सदर कारवाई मा. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक जालना, मा. आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार, सपोनि सुशिल चव्हाण, पोउपनि मारीयो स्कॉट, सपोउपनि मनसुब वेताळ, पोहेकों प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अशोक जाधव, अभिजीत वायकोस, रवि देशमुख, समाधान उगले, राजेंद्र पवार, पोकों गजानन काकडे, दिपक डेहंगळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button