राकेश ओला अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळख !
(अमरावती जिल्हा) प्रतिनिधी.

अमरावती:- महाराष्ट्र पोलीस खात्यात आता हळुवार बदल्यांचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. यामध्ये आज कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे राकेश ओला यांची अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आज रोजी नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक तर नागपूर बृहन्मुंबई अशा विविध ठिकाणी उत्कृंष्ट सेवा दिली आहे. राकेश ओला हे 2012 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर 2014 मध्ये नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने नगरसह संपूर्ण राज्यांत चांगलाच हैदौस घातला होता अशा टोळीचा त्यांनी चांगला छडा लावला होता. तसेच अहमदनगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, आज रोजी त्यांची अमरावती चे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.*



