Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरात अवैध पार्किंग बिनदास, पोलिसांनाचा कानाडोळा…

प्रतिनिधी पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरात थरमॅक्स चौक ते बर्ड व्हॅली अवैध पार्किंगचा सुळसुळाट.. जागा मिळेल तेथे पार्किंग केली जात आहे. एकीकडे नोवेल शाळा असल्याने दु पारी शाळा सुटल्यानंतर आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीचा मनस्ताप पालकांना सर्रास करावा लागतो; परंतु वाहतूक पोलिस मात्र याकडे डोळेझाक करत आहेत.वाहनचालकांवर कारवाई होत नाही. येथे अवैध पार्किंग होत असून त्याची पोलिसांचे दुर्लक्ष आहे कारण त्यांचे हप्ते चालू असल्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न पडला आहे
अजित पवारांचे आदेश; पिंपरीत वाहतूक कोंडीवर उपाय करा…


पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी वाढल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. पदपथावर व रस्त्यावर नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करा. रस्ते मोकळे करा. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांना दिले.असूनपण कारवाई होत नाही.
अवैध पार्किंगचा प्रश्न सुटेल का असा जनतेला पडलेला प्रश्न.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button