स्था.गु.शा. पथकाकडून अवैध हातभट्टीवर छापेमारी एकुण 48,000/- रु. चा मुद्देमाल जप्त

भंडारा :- पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत फरार आरोपी नामे सुनिल जगदिश सेलोकर, वय 30 वर्षे, रा.नेहरू वार्ड, शहापुर, ता. जि. भंडारा, यातील फिर्यादी पो. हवा. तुमाने यांनी गुप्त माहितीवरुन छापेमारी केली असता नमुद आरोपी मौजा शहापुर शेतशिवार येथे मिळून आल्याने नमुद आरोपीच्या ताब्यातून 1) 06 प्लॉस्टीक चुंगळ्या मध्ये अंदाजे प्रत्येक चुगळीत 40 किलो सडवा मोहाफास (रसायन), असा एकुण अंदाजे 240 किलो सळवा मोहाफास प्रति किलो 200 रु. प्रमाणे किमती 48,000/- रु.चा मुद्देमाल मिळून आल्याने अप. क्र. 440/2025 कलम 65 (फ) म.दा.का. अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा., पो.नि. चिचोंळकर सा. यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. तुमाने, स्था.गु.शा. यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन जवाहरनगर चे अधिकारी करीत आहेत.




